Ad will apear here
Next
जिद्दीची वीण घालून ‘तिने’ साकारले स्वप्न!
गरीब कुटुंबातील सावित्री बड्या कंपनीत फॅशन डिझायनर
सावित्री बाळासो ममदापुरे

पुणे : मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुल्या करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा लढा सार्थ ठरवला आहे आणखी एका सावित्रीने. शेतमजुरी करून आयुष्य जगणाऱ्या, कुडाच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील सावित्री बाळासो ममदापुरे आज एका मोठ्या टेक्स्टाइल कंपनीत फॅशन डिझायनर म्हणून काम करत आहे. तिची जिद्द तिला इथपर्यंत घेऊन आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुललाट येथील बालोद्यान या संस्थेने केलेल्या सहकार्यामुळे सावित्रीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या खेडेगावात शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब घरात जन्मलेल्या सावित्रीला पहिल्यापासूनच शिकण्याची प्रचंड ओढ होती. कुडाच्या घरात राहणाऱ्या या सावित्रीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही दहावी, बारावीला चांगले गुण मिळविले. तंत्रज्ञ व्हायचे स्वप्न ती पाहत होती; पण घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे आणि लहान भावाच्या शिक्षणासाठी तिला आपल्या स्वप्नांवर पाणी सोडावे लागले. 


पुढे शिकण्याची तळमळ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिने २०१७मध्ये ‘बीए’ला प्रवेश घेतला. वर्षभर अभ्यास केल्यानंतर परीक्षा देण्याची वेळ आली, तेव्हा परीक्षेची फी भरण्यासाठी तिच्याकडे ३५० रुपयेसुद्धा नव्हते. ही गोष्ट बालोद्यान संस्थेचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार संजय खूळ यांच्या लक्षात आली. त्याच दिवशी सुदैवाने एक सुंदर योग जुळून आला. इचलकरंजी येथील ‘डीकेटीई’ या विख्यात संस्थेत फॅशन डिझायनिंगच्या अभ्यासक्रमासाठीची एक जागा प्रवेश रद्द केला गेल्यामुळे रिक्त झाली होती. याची माहिती संजय खूळ यांना मिळाली. अर्थात, ८० हजार रुपये फी आणि इतर शैक्षणिक खर्चाचा मोठा प्रश्न आ वासून उभा होता आणि निर्णय कळवायला हातात वेळसुद्धा नव्हता. त्या एका जागेसाठी खूप विद्यार्थी इच्छुक होते. त्या वेळी ‘बालोद्यान’ने तत्काळ निर्णय घेतला आणि सावित्रीचा प्रवेश निश्चित केला. 

अतिशय मेहनत घेऊन सावित्रीने दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम उत्तम रीतीने पूर्ण केला आणि आज तिला तमिळनाडूमधील तिरुपूर इथल्या स्टालवर्ट टेक्सटाईल्स या मोठ्या टेक्स्टाइल कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे.  

कुलभूषण बिरनाळे
‘सावित्रीच्या या प्रवासाला ‘बालोद्यान’ला साथ देता आली, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. येथून पुढच्या काळात अशा किमान १०० सावित्रींना घडवायचे स्वप्न उराशी बाळगून आहोत. त्यासाठी गरज आहे ती समाजाच्या सहकार्याची. अशी साथ मिळाली, तर दोन-चारशे रुपये फी भरायला, बसचा पास काढायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करणाऱ्या सावित्रीच्या लेकी वाचतील, शिकून स्वावलंबी होतील. स्वतःच्या प्रगतीबरोबर कुटुंबाची, पर्यायाने देशाची प्रगती करतील,’ अशी भावना ‘बालोद्यान’चे कुलभूषण बिरनाळे यांनी व्यक्त केली. 


(‘बालोद्यान’च्या कार्याची ओळख करून देणारा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी  येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZTACC
Similar Posts
...पीड पराई जाने रे...! ‘वैष्णव जन तो..’ या भजनाचा शब्द न् शब्द जगणारा तरुण म्हणजे अब्दुललाट या कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा गावातला तरुण कुलभूषण बिरनाळे! खडतर परिस्थितीतून स्वतः इंजिनीअर होऊन अनेक आंतरराष्रीप8य कंपन्यांमध्ये काम करून या तरुणाने कर्तृत्व गाजवलं. त्याच वेळी समाजातील वंचितांचाही विचार त्याने केला. निराधार मुलांसाठी
पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून १०० घरे उभारण्याचा ‘बालोद्यान’चा संकल्प पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी लोकसहभागातून शंभर नवी घरे बांधण्याचा संकल्प मूळचे कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचे आणि आता पुण्यात स्थायिक असणारे कुलभूषण बिरनाळे आणि अन्य समविचारी व्यक्तींनी केला आहे.
जर्मन तज्ज्ञांचे ‘डीकेटीई’मध्ये मार्गदर्शन इचलकरंजी : जर्मन वस्त्रोद्योगातील तब्बल ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे तज्ज्ञ रॉल्फ मुलर व श्री. शेफर यांनी ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमधील टेक्स्टाइलच्या विद्यार्थ्यांना एका महिना कालावधीसाठी अद्ययावत प्रशिक्षण दिले. त्यांच्या या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांसोबत, प्राध्यापक व स्टाफ यांनाही झाला
पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्या धुळाप्पांचा सत्कार! पुणे : कृष्णा नदीला नुकत्याच आलेल्या महापुरात स्वतःच्या जिवावर उदार होऊन सुमारे पाच हजार जणांचे प्राण वाचवणाऱ्या धुळाप्पा आंबी (पुजारी) या नावाड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील नगरसेवक आबा बागुल यांनी पुणे नवरात्रौ महोत्सव समितीतर्फे ११ हजार रुपये, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language